Sunday, August 22, 2021

लोक कला की ओर से दलित पैंथर ने किया संवाद* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से मिलने के प्रस्ताव को मंजूरी

लोककलांचा दलित पँथर च्या वतीने संवाद मेळावा संपन्न *मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला

  (वाशिम) :लोक कलावंतांच्या स्थगित आणि प्रलंबित मागण्यांसाठी दलित पँथर च्या वतीने वाशिम जिल्ह्यात दलित पँथर चे नेते भाई जगदिश कुमार ईगळै यांच्या अध्यक्षतेखाली लोक कलावंतांचा संवाद मेळावा दि २१/८/२०२१रोजी संपन्न झाला या संवाद मेळाव्याचे आयोजन पुरुषोत्तम महाराज व्यसन मुक्ती केंद्र आडोळी चे मुख्य संयोजक शाहिर के, के, डाखोरे यांनी केले होते सवांद मेळाव्याला दलित पँथर चे राष्ट्रीय नेते भाई जगदिश कुमार ईगळै यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, कलावंतांच्या मागण्या बाबत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची सकारात्मक भुमिका असुन मुख्यमंत्री ऊदधव ठाकरें यांनी कलावंतांना ५०००/रुपये मदत घोषित केल्यामुळे कलावंता मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे   
              मुंबई येथे दलित पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडी घेतली सरकारचे मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा शरदचंद्र पवार यांची भेट घेतली असल्याचे भाई जगदिश कुमार ईगळै यांनी उपस्थित कलावंतांना सांगितले  
        पुढे भाई जगदिश कुमार ईगळै यांनी सांगितले की लवकरच मुंबई येथे जावुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन वाशिम जिल्ह्यातील कलावंतांच्या मागण्या मान्य करण्यासाठी दलित पँथर चे केंद्रीय शिष्टमंडळ दलित पँथर चे राष्ट्रीय सरचिटणीस राजेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्याचा प्रयत्न केला जाईल असे भाई जगदिश कुमार ईगळै यांनी उपस्थित कलावंतांना सांगितले    
या संवाद मेळाव्यात युवा सेना जिल्हा प्रमुख रवि भांदुरगे पंचायत समिती सभापती बाळासाहेब देशमुख मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे अध्यक्ष भागवत कांबळे, तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्राप्त दिवंगत सखाराम काठोळे यांचे चिरंजीव तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रिसोड तालुक्यातील नेते नंदु पाटील (काठोळे)  गजानन गायकवाड , वनिता डाखोरे, रवि डाखोरे, लक्षमण सावळे, वैभव मोकळे, प्रदीप राजे, परलाद खंडाळे सहित शेकडो महिला-पुरुष कलावंत संवाद मेळाव्यात सहभागी झाले होते 
        भाई जगदिश कुमार ईगळै             (राष्ट्रीय नेते) दलित पँथर

No comments:

Post a Comment