Monday, October 11, 2021

उत्तर प्रदेशातील लखिमपुर खिरी हिंसाचाराच्या विरोधात बोढरे गावात रॅली काढून जाहीर निषेध

*उत्तर प्रदेशातील लखिमपुर खिरी हिंसाचाराच्या विरोधात बोढरे गावात रॅली काढून  जाहीर निषेध.....*
*बोढरे, शिवापूर, पिंपरखेड, लोंजे, या गावातील  सोलर पिडीत शेतकर्यांनी मिळून निषेध नोंदवला,*
*शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने, अन्यायग्रस्त सोलर प्रकल्प पिडीत शेतकर्यांनी लखिमपूर खिरी घटनेच्या निषेधार्थ मोदी सरकारच्या विरोधात काळ्या फिती लावून , काळे झेंडे दाखवत  निदर्शने / घोषणा दिल्या, मोजक्या  शेतकर्यांसह. गावातून रॅली काढून जाहीर निषेध नोंदवला. व*
*राज्याच्या महाविकास आघाडी सरकारडून पुकारण्यात आलेल्या आजच्या महाराष्ट्र बंद हाकेला प्रतिसाद दर्शविला,*

*केंद्र सरकारने लादलेल्या काळ्या कृषी कायद्याच्या विरोधात उत्तर प्रदेशातील लखमीपुर खिरी येथे शांततेत आंदोलन करणार्या शेतकर्यांच्या अंगावार गाडी घालून‌ ६ ते ८ शेतकर्यांना जिवेठार मारनार्या केंद्रीय राज्य मंत्रीच्या मुलासह त्यांच्या साथीदारांना अटक करून फाशीची शिक्षा द्या अशी मागणी यावेळी शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आली,*

*या प्रसंगी  समितीचे सचिव भिमराव जाधव यांनी घटनेचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त करतांना सांगितले की, केंद्रातील भाजप सरकार हे  शेतकरी विरोधी सरकार आहे, त्यांचेच अनुयायी  राज्यातील बीजेपीचे नेतेमंडळी ईच्छा असूनही लखिमपूर घटनेबद्दल तोंडातून चक्कार शब्दही काढणार नाही, असे वाटते की, ?  बीजेपीने  तसा अजेंडाच ठरवून दिला असावा ?  की, , बीजेपीतील कुठल्याही नेत्यांनी शेतकर्यांवर अथवा कुणावरही कसलाही अन्याय केला तर बीजेपी पक्षातील कुणीही त्याबद्दल बोलायचे नाही अन्यथा पक्षातून त्यांची हकालपट्टी केली जाईल ?  अशी ताकीदच  दिली जात असावी, ?   राज्यातील बरेचसे बीजेपीचे आमदार / खासदार हे  शेतकरी कुटूंबातील असून काहीजन स्वताला शेतकर्यांचे कैवारी म्हणून देखील मिरवतात , असे लोकप्रतिनिधी हे शेतकर्यांवर होत असलेल्या क्रुर अन्याया बद्दल जेव्हा बोलत नाही तेव्हा शेतकर्यांबद्दलचा त्यांचा कळवळा दिसून येतो. तसे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचा शेतकर्यांविषयी असलेला खोटा कळवळा  सोलर प्रकरणावरून तालुक्यातील जनतेला  स्पष्ट दिसून आले आहे ,*

*जसे लखिमपूर खिरी येथील आंदोलक शेतकर्यांंच्या अंगावर गाडी घालून जिवेठार मारले गेले तसा प्रयत्न एका अनोळखी व्यक्तींकडून  मला  व काही सोलर  पिडीत शेतकर्यांना वेगवेगळ्या प्रकारे  जिवेठार मारण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला गेला, सुदैवाने आम्ही बचावलेलो आहे, संशयित म्हणून सोलर प्रकल्पाचे मालक व बड्या राजकीय व्यक्तींच्या नावाने पोलीसात तक्रार  दिली  परंतू  पोलीसांकडून कुठलीच कारवाई झाली नाही,  मौजे बोढरे, शिवापूर शिवारात थाटण्यात आलेले दोन बेकायदा सोलर प्रकल्प हे बीजीपीचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांच्या राजकीय आश्रयाखाली प्रकल्प उभे राहीले आहे, त्या विरोधात गेल्या ४ वर्षांपासून सातत्याने शासण दरबारी  न्यायासाठी लढा देत आहोत परंतू हे बीजेपी पक्षातील शेतकर्यांचे राजकीय वैरी आजही आम्हाला न्यायापसून वंचित ठेऊ  पाहत आहे,  केंद्रातील भाजप सरकार हे बड्या धनाढ्य  उद्योगपतींच्या हिताचे सरकार असून शेतकर्यांच्या जिवाशी खेळणरे सरकार आहे त्याचा मी सोलर पिडीत शेतकर्यांच्या‌ वतीने  जाहीर निषेध व्यक्त करतो,*

*शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष अड, भरत चव्हाण यांनी लखिमपूर घटनेचा निषेध व्यक्त केला व सांगितले की, बीजेपीच्या नेत्यांमुळे सोलर प्रकल्प आले आणि त्यांच्याच राजकीय मदतीने गरीब अशिक्षित ऊसतोड कामगार असलेल्या गोर बंजारा समाज व काही दलित / मुस्लिम समाजातील शेतकर्यांचा जमिनी मातीमोल भावात बळकावल्या आहेत, आज या निमित्ताने लखिमपूर घटनेचा निषेध व्यक्त करीत असतांना सोबतच सोलर  प्रकल्पला पाठीशी घालून शेतकर्यांवर अन्याय करणार्या राजकीय नेत्यांचे देखील जाहीर  निषेध  भरत चव्हाण यांनी व्यक्त केलेत,*
*या प्रसंगी समितीचे जेष्ठ मार्गदर्शक चत्रू राठोड उपस्थित  होते तर  निषेधार्थ रॅलीचे आयोजन  समितीचे उपाध्यक्ष चुनिलाल राठोड, पिडीत शेतकरी सोमा राठोड, भगवान राठोड , मदन राठोड, अदींने केलेत, तर निषेध व्यक्त करायला बोढरे , शिवापूर , लोंजे,  पिंपरखेड , येथून सर्व पिडीत शेतकरी जमा झाले होते,*
*भिमराव जाधव ( शेतकरी बचाव कृती समिती चाळीसगाव)*

No comments:

Post a Comment