Wednesday, October 6, 2021

आज आंदोलनाचा १६ ,व्या . दिवशी सरकारला थोडी जागा आली, आंदोलन तिव्र‌ करू नका प्रकल्पाची S.I.T. चौकशी बाबत

*आज आंदोलनाचा  १६ ,व्या . दिवशी सरकारला थोडी जागा आली, आंदोलन तिव्र‌ करू नका प्रकल्पाची S.I.T. चौकशी बाबत शासण विचाराधीन असल्याचे पोलीसांमार्फत कळविण्यात आले, उद्या पर्यंत खुलासा कळेल,,*
*६ महिन्यात  सगळे भ्रष्टाचार बाहेर काढण्याची मोहीम हाती घेतलेल्या भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या  ट्विटर अंकाऊटवर  ट्विट, करून  समितीचे कार्याध्यक्ष किशोर सोनवणे सरांनी  या प्रकरणी मदत करण्याचे सांगूण ,समोरा ,समोर खुली चर्चा करण्याचे आव्हानही केले,  यावर किरीट भाऊंनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही, मेसेज वाचून फसवणिसशी चर्चा केली असावी,? स्वताच्या पक्षातील नेत्यांचे भ्रष्टाचार ठेवायचे झाकून, आणि दुसर्याचे बघायचे डोळे वासून, केवळ राजकीय सुडभावनेतून चालवलेली भ्रष्टाचार मोहीम आहे ही,*

 *सत्तेचा दुरूपयोग करून माजी मुख्यमंत्री फसवणिसने गरीब अशिक्षित ऊसतोड कामगार असलेल्या गोर बंजारा समाजाच्या शेकडो एकर शेतजमिनी कवडीमोल भावात  गैरमार्गाने, बड्या उद्योगपतींच्या घषात घातल्या, पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात कुठलेही उद्योग उभारता येत नाही असे महाराष्ट्र कुळकायदा , शेतजमिनी अधिनियम अंतर्गत राज्य शासनाच्या शिफारशीने केंद्र सरकारने निर्बंध घालून दिलेले असतांना, प्रकल्प झालाच कसा ? अशा अनेक गंभीर बेकायदेशीर बाबी आहेत, त्या जर का उजेडात आल्या तर प्रकल्पाला पाठीशी घालून शेतकर्यांवर अन्याय करणार्या अनेक बीजीपे नेत्यांचे पित्तळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही,,*
*भिमराव जाधव ( शेतकरी बचाव कृती समिती चाळीसगाव )*

No comments:

Post a Comment